उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन मृत्यू 

 
Osmanabad police

उमरगा  : चालक- महेश मुसळंबे, रा. तुरोरी, ता. उमरगा यांनी दि. 6 सप्टेंबर रोजी 16.00 वा. सु. तुरोरी गावातील उड्डानपुलाजवळ ॲपेरिक्षा क्र. एम.एच. 25 एके 0951 हा निष्काळजीपने चालवून बबन पंडीत माने, वय 30 वर्षे, रा. दाबका हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 24 डब्ल्यु 3407 ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- पंडीत माने यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : चालक- विजय रामलिंग कांबळे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 17.08.2021 रोजी 16.30 वा. सु. गोवर्धनवाडी येथील रस्ता वळणावर स्कुटर क्र. एम.एच. 25 एयु 3527 ही निष्काळजीपने चालवल्याने घसरली. या अपघातात स्कुटरवर पाठीमागे बसलेले काकासाहेब दासा जाधव, वय 44 वर्षे, रा. गोविंदपुर, ता. कळंब यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- ध्म्मशिला जाधव यांनी अनैसर्गीक मृत्यूच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरी 

तुळजापूर : अशोक इंगळे, रा. तुळजापूर यांच्या बोरी येथील शेत गोठ्यासमोर ठेवलेल्या दोन म्हशी व शेत शेजारी- महादेव गंधोरे यांची एक जर्सी गाय दि. 4- 5 सप्टेंबर रोजी च्या रात्री अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अशोक इंगळे यांनी दि. 11 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा : नितीन रमेश करनुरे, रा. उमरगा हा दि. 11 सप्टेंबर रोजी उमरगा बसस्थानकात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ करत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web