धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

कळंब  :मयत नामे- तुषार सुग्रीव कदम, वय 24 वर्षे, रा.कारी ता. जि. उस्मानाबाद हे दि.31.08.2023 रोजी 19.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 डीपी 5372 यावरुन हॉटेल उपसरपंच समोर हासेगाव शिवार येथुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच एक्यु 0339 चा चालक यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून तुषार कदम यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात तुषार  कदम हे गंभीर जखमी  होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी सुग्रीव सोमनाथ कदम, वय 60 वर्षे, रा. कारी ता.जि. उस्मानाबाद यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 अ सह मो.वा. का. कलम 184, 134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


येरमाळा  :आरोपी नामे- आकाश सोनवणे, सोबत मयत नामे- अमर अंकुश लाटे, वय 25 वर्षे,  दोघे रा. कल्पनानगर, ता.कळंब जि. उस्मानाबाद हे दि.28.08.2023 रोजी 02.00 वा. सु. टोयोटा टियोस गाडी क्र एमएच 48 ए 4266 यामधून येरमाळा घाटातुन जात होते. दरम्यान आकाश सोनवणे यांनी त्याचे ताब्यातील टोयोटा टियोस गाडी ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून नमुद गाडीचा आपघात झाल्याने या आपघातात अमर लाटे हे गंभीर जखमी  होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी आकाश अंकुश लाटे, वय 28 वर्षे, रा. कल्पनानगर, कळंब ता. कळंब जि.उस्मानाबाद यांनी दि.04.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 अ सह मो.वा. का. कलम 184, 134 अ ब अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

शिराढोण  : आरोपी नामे- 1)बालाजी विठ्ठल यादव, 2) कमल बालाजी यादव, 3) समाधान बालाजी यादव, 4) प्रियंका समाधान यादव सर्व रा. शिराढोण ता. कळंब जि. उस्मानाबाद यांनी दि.02.09.2023 रोजी 17.30 ते 18.00 वा. सु. शिराढोण शिवार येथे फिर्यादी नामे- रुक्मीनी गोविंद यादव, वय 65 वर्षे, रा शिराढोण, ता. कळंब जि. उस्मानाबाद यांना नमुद आरोपीने शेतातील सामाईक बांधावरुन जाण्या येण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच परमेश्वर यादव हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन हात पिरगाळुन पायावर मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी रुक्मीनी यादव यांनी दि.04.09.2023 दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web