धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

धाराशिव  : चंद्रकांत नारायण कुलकर्णी ( वय 62 ) वर्षे रा. वाघोली ह.मु. समता कॉलनी उस्मानाबाद हे दि.24.05.2023 रोजी 19.30 वा. सु. तुळजाभवानी संकुल समोर उस्मानाबाद येथुन दुध घेवून परत येत असताना अज्ञात वाहन चालकाने  त्याचे ताब्यातील वाहन ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून चंद्रकांत कुलकर्णी यांना धडक दिली. यात चंद्रकांत कुलकर्णी गंभीर जखमी होवून उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- चिन्मय चंद्रकांत कुलकर्णी यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.  

वाशी  : शिवदास उर्फ राजेंद्र सुतार, रा. इटकुर, ता. कळंब जि. उस्मानाबाद हे दि.25.05.2023 रोजी 11.30 वा. सु. एनएच 52 हायवे रोडवर पार्डी शिवारातील चौधरी यांचे पेट्रेाल पंपाजवळ मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 9721 हीवर जात होते. दरम्यान अशोक लिलॅन्ड टेम्पो चा टेम्पररी पासींग क्र टीएन 70 टीसी 161 चे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन ही हायगई व निष्काळजी पणे भरधाव वेगात चालवून शिवदास सुतार यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. यात शिवदास सुतार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची बायको- दैवशाला शिवदास उर्फ राजेंद्र पांचाळ यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.      

रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 कळंब  : आरोपी नामे-1)अमीर खालेद पिंजारी, वय 32 वर्षे, रा. संभाजी नगर डिकसळ ता. कळंब  जि. उस्मानाबाद यांनी दि.29.07.2023 रोजी 14.00 वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 पी 5366 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : आरोपी नामे-1)अशपाक हमीद मुजावर, वय 37 वर्षे, रा. सोमवार पेठ ता. परंडा जि. उस्मानाबाद यांनी दि.29.07.2023 रोजी 13.30 वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक कोर्ट परंडा समोर येथे आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 24 एफ 323 हा रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे करुन भा.द.वि.सं. कलम-283 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो. ठाणे येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web