धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

उमरगा : मुळज, ता. उमरगा येथील-मोहन सटवा सुर्यवंशी, वय 48 वर्षे, सोबत अतिष व्यंकट कांबळे हे दोघे दि.03.07.2023 रोजी 23.30 वा. सु.मुळज शिवारातील विश्वनाथ जांभळदरे यांचे शेताजवळ  अतिष यांनी कार क्र एमएच 25 ए डब्ल्यु 3244 ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून कार रोडचे कडेला खड्यात पलटी करुन मोहन हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या गौतम नारायण कांबळे यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा : देवगाव रोड परंडा येथील-ओम दादासाहेब काळे, वय 14 वर्षे,  हे दि.15.06.2023 रोजी 11.30 ते 12.00 वा. सु. सिना कोळेगाव कॉलनी परंडा समोर टमटम क्श्र एमएच 13 आर 8015 ने जात होते. दरम्यान टमटम चालक नामे दादासाहेब महादेव काळे यांनी टमटम हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रोडचे कडेला खड्यात पलटी होवून अपघात झाला. या आपघातात ओम हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या नितीन प्रकाशराव गुंडाळे यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 184, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

तामलवाडी  : दहिवडी, ता. तुळजापूर येथील- सौदागर प्रभु गाटे, वय 55 वर्षे, यांच्या दहिवडी शिवारातील शेतातील बांधलेल्या  एक जर्सी अंदाजे 70,000 ₹ किंमतीच्या ही दि.04.07.2023 रोजी 08.00 ते 05.07.2023 रोजी 06.00 वा. सु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सौदागर यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

    मारहाण 

वाशी  : डोंगरेवाडी, ता. वाशी येथील- बालाजी भराटे, धनाजी भराटे, मेघराज भराटे अन्य 3 यांनी  दिवाणी दावा दाखल केल्याचे कारणावरुन दि.05.07.2023 रोजी 09.00 वा.सु. डोंगरेवाडी शिवारात  गावकरी- विकास वंसत भराटे  यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुह्राडीने, दगडाने व रॉडने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विकास भराटे यांनी दि.06.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504,506, 143, 147, 148, 149  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
                                                                                                                                                

From around the web