धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

येरमाळा  : खानापुर, ता. वाशी येथील- जालिंदर विठ्ठल शिंदे, हे दि.15.06.2023 रोजी 21.30 ते 21.45वा. सु. येरमाळा बसस्थानक समोरुन जात होते. दरम्यान बस क्र एमएच 14 बीटी 4707 चा चालक नामे आसिफ जब्बार मुलानी, रा. बार्शी, जि. सोलापूर  यांनी त्यांचे ताब्यातील बस हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून जालिंदर यांना पाठीमागून धडक दिली.  या आपघातात जालिंदर  हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या बाळासाहेब शिंदे  यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 नळदुर्ग  : पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर येथील- बंदेनवाज महेताब नदाफ, वय 44 वर्षे, सोबत रुक्मोदिन बंदेनवाज नदाफ हे दोघे दि.13.06.2023 रोजी 21.00 वा. सु. एनएच 65 हायवे रोडवर इटकळ ते पिंजारवाडी  इटकळ शिवार येथुन बोलेरो जिप क्र डब्ल्यु बी 94 ई 5262 जात होते. दरम्यान ट्रक क्र एमएच 12 टीव्ही 8895 चा चालकाने त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अचानक एका लेन्थ रोडवरुन दुसऱ्या लेन्थवर ट्रक घेतल्याने बोलेरो ही ट्रकला पाठीमागून जावून धडकली.  या आपघातात बोलेरो चालक बंदेनवाज हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. रुक्मोदिन बंदेनवाज नदाफ यांना गंभीर जखमी करुन जखमीना उपचारासाठी घेवून न जाता अपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या रुक्मोदिन बंदेनवाज नदाफ यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब), 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 येरमाळा  : कडकनाथवाडी, ता. वाशी येथील- संजय मारुती तोडरमल यांनी दि. 17.06.2023 रोजी 16.50 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे  क्र. एम.एच. 23 एक्स 1876 हे एनएच 52 रोडवरील तेरखेडा ब्रिजचे बाजूला सर्व्हिस रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना येरमाळा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे. 

From around the web