धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

मुरुम : धानुरी, ता. लोहारा येथील- शौकत चांद मुल्ला सोबत गावकरी -अनंत सुरेश वडजे वय 25 वर्षे हे देाघे दि.04.06.2023 रोजी 20.45 ते 21.00 वा. सु. दक्षिण जेवळी ते आष्टामोड आश्रम शाळेजवळ रिक्षातुन जात होते. दरम्यान रिक्षा क्र एम एच 25 एम 265 चा चालक शौकत यांनी त्यांचे ताब्यातील रिक्षा हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रिक्षा पल्टी होउन आपघात झाला. या अपघातात  अनंत हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- लक्ष्मण हरी वडजे यांनी दि.12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 336 304 (अ)  सह मो.वा. का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : फरताबाद, ता. कलबुर्गी येथील- इरम्मा रामय्या पवार, वय 54 वर्षे ह्या दि.01.06.2023 रोजी 08.30 वा. सु. चौरस्ता आरटी. ओ. ऑफीस समोर उमरगा येथे जाण्यासाठी पायी रोड ओलांडत होते. दरम्यान ट्रक क्र जी जे 03 बी. टी. 3855 च्या चालकांने त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून इरम्मा यांना उजव्या बाजूस धडक दिली. या आपघातात इरम्मा ह्या गंभीर जखमी होऊन  उपचार दरम्यान मयत झाल्या. अशा मजकुराच्या बसवराज रमय्या पवार  यांनी दि.12.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ)  सह मो.वा. का. कलम 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

ढोकी : ढोकी, ता. उस्मानाबाद ग्रामस्थ- नितीन अरुण समुद्रे हे दि.12.06.2023 रोजी 20.40 वा. सु. आपआपल्या ताब्यातील मोटरसायकल  क्रमांक एम एच 25 झेड 3352 ही ढोकी पेट्रोलपंप येथे वेडयावाकडया रितीने चालवताना ढोकी पो ठा चे पथकास मिळुन आला. सदर चालकाने मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

From around the web