धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

उमरगा  : बलसुर, ता. उमरगा येथील- रुक्मीन शिवलींग कुंभार, या दि.01.05.2023 रोजी दुपारी 02.00 वा. सु. बलसुर ते उमरगा येथे ॲपे रिक्षा मध्ये जात होत्या. दरम्यान ॲपे रिक्षा क्र एम एच 25 एन 0776  चा चालक नामे आकबर कासीम तांबोळी यांनी त्यांचे ताब्यातील रिक्षा हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवल्याने रिक्षा डिव्हायडरवर जावून पल्टी होवुन रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. या अपघातात रुक्मीन या गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या रियाज इमाम शेख रा. बलसुर, ता. उमरगा यांनी दि.04.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 304 (अ) सह कलम 184, मो. वा. का.  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव : रसुलपुरा नागनाथ रोड, उस्मानाबाद येथील- इरशाल महेबुब कुरेशी, वय 45 वर्षे, हे दि.20.05.2023 रोजी रात्री  12.30 वा. सु. उस्मानाबाद शिवारातील शिंदे वकील यांचे शेताजवळील वळणावर वैराग ते उस्मानाबाद रोडवर पायी जात होते. दरम्यान टेम्पो क्र एम एच 15 बी.जे. 1810 चा चालक नामे रफीक पैंगबर पठाण रा. खिरणी मळा, उस्मानाबाद यांनी त्यांचे ताब्यातील टेम्पो हा हायगई व निष्काळजी पणे चालवून पायी जात असलेले इरशाल यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात इरशाल हे गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- जावेद महेबुब कुरेशी यांनी दि.04.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  गावशिवाराच्या आवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

तुळजापूर  :आपसिंगा, ता. तुळजापूर येथील- अतुल बाळासाहेब लौके  हे दि.03.06.2023 रोजी 23.00 वा सुमारास आपसिंगा गावातील देवी मंदीरासमोर कात्री रोडवर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना डायल 112 कॉल करुन मारहाण बाबतची खोटी माहिती देताना. तुळजापूर पो. ठा. च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1), 182  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web