धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार 

 
crime

मुरुम - दाळींब, ता. उमरगा येथील- आनंदराव तुकाराम माने, वय 58 वर्षे, हे दि.19.04.2023 रोजी 08.30 वा. सु. एनएच 65 रोडवर मुरुममोड चौकातुन मुरुमकडे जाणारे रोडवरुन जात होते. दरम्यान टिप्पर क्र एमएच 25 एजे 5455 च्या चालकाने त्याच्या ताब्यातील टिप्पर हे वेगात हायगई व निष्काळजीपने चालवल्याने आनंदराव साईडने धडक दिली. 

या अपघातात आनंदराव हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- शिवाजी आनंदराव माने यांनी दि.20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 134 अ ब  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  - बालाजी नगर, उस्मानाबाद येथील- बालाजी सुभाष ढोकणे, वय 35 वर्षे, हे दि.14.03.2023 रोजी 11.30 वा. सु. जवाहर गल्ली तुळजापूर येथे बांधकामावर काम करण्यासाठी गेले असता शिवाजी धोंडीराम राठोड रा. सेवालाल कॉलनी, उस्मानाबाद यांनी हायगई व निष्काळजीपने बांधकामावरील कामगाराच्या सुरक्षासाठी हेल्मेट, सुरक्षापट्टा, सुरक्षा झोका, जॅकेट, गम बुट, न देता कामावर लावले.

 यात बालाजी हे लेन्टनचा बॉटम निसटल्याने ते बांधकामाचे कॉलम व भिमवर पडल्याने डोक्यास पाठीमागे मार लागून गंभीर जखमी होऊन उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- अश्विनी बालाजी ढेकणे यांनी दि.20.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  304 (अ), सह मो. वा. कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                                                             

From around the web