धाराशिव जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार
कळंब : करंजकल्ला, ता. कळंब येथील- नारायण तुकाराम पवार, वय 76 वर्षे, हे दि. 14.03.2023 रोजी 12.15 वा. सु. ढोकी रोड कृष्णा हॉस्पीटल कळंब समोर डिकसळ परिसर येथे रस्त्याने स्कुटर क्र एमएच 43 एई 2241 वरुन जात होते. दरम्यान ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर क्रं एमएच 23 बी 9150 हा भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने नारायण चालवत असलेल्या स्कुटरला पाठीमागून धडक दिली. या अपघातात नारायण हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या आपघातानंतर ट्रॅक्टर चालक आपघात स्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा-संजयकुमार नारायण पवार यांनी दि. 23.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184, 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : पानचिंचोली, ता. निलंगा येथील- ज्योतीराम मोतीराम चव्हाण, वय 35 वर्षे, हे दि. 25.02.2023 रोजी 21.30 वा. सु. जकेकुर शिवारात लक्ष्मी वजन काटा समोर उमरगा ते सोलापूर जाणारे रस्त्या वरुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने ज्योतीराम यांना साईडने धडक दिली. या अपघातात ज्योतीराम हे गंभीर जखमी होउन मयत झाले. या आपघातानंतर अज्ञात वाहन चालक हा आपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- राणुबाई ज्योतीराम चव्हाण यांनी दि.23.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ), सह मो. वा. कायदा कलम 184, 134 अ ब अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.