धाराशिव जिल्ह्यात तीन अपघातात दोन ठार, पाच जखमी 

 
crime

तुळजापूर :मयत नामे- सुनिल वसंत माळी- क्षिरसागर, वय 27 वर्षे,रा. कामठा, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद हे दि.04.09.2023 रोजी 19.30 वा. सु. उस्मानाबाद ते तुळजापूर जाणारे रोडने मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 6978 वरुन तुळजापूर कडे जात असताना बाबा पेट्रोल पंप जवळील समाधान हॉटेलचे समोरील रोडवर तुळजापूर येथे छोटा हत्ती क्रंमाक एमएच 25 पी. 1946 च्या अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील छोटा हत्ती हा हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अचानक ब्रेक मारल्याने सुनिल माळी- क्षिरसागर यांचे मोटरसायकलला धडकून यामध्ये सुनिल माळी क्षिरसागर हे गंभीर जखमी  होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी धनंजय वसंत माळी- क्षिरसागर, वय 34 वर्षे, रा. कामठा, ता.  तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.09.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 अ सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा  :दि.06.07.2023 रोजी 23.30 वा. सु. विष्णू गहिनीनाथ पाटील रा. जकेकुर यांचे घराजवळ असलेल्या हैद्राबाद ते सोलापूर जाणारे रोडवर अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे  हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अनोळखी वेडसर इसम वय अंदाजे 30 वर्षे, यास धडक दिल्याने नमुद इसम हा डावे पायास फॅक्चर होवून त्याचे डोकृयास मार लागुन उपचार दरम्यान मयत झाला. अशा मजकुराच्या पोलीस ठाणे उमरगाचे पोलीस हावलदार/133 विष्णु किसनराव मुंढे यांनी दि.09.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 अ सह मो.वा. का. कलम 134 (अ) (ब) 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :जखमी नामे- अर्जुन बाबाराव मैंद्रे, वय 40 वर्षे, सोबत अशोक जमादार, रा. कोथन हिप्परगा ता. आळंद जि. कलबुर्गी हे दोघे दि.03.09.2023 रोजी 21.00 वा. सु. उमरगा चौरस्ता ते आळंद जाणारे रोडवर कदेर पाटीजवळ मोटरसायकल क्र के.ए. 04 एच. आर. 6703 वर बसून जाते होते दरम्यान मोटरसायकल क्र के.ए. 32 ई. एच 9837 चा चालक नामे- राहुल दुदु पवार, रा. कोराळी तांडा ता. आळंद जि. कलबुर्गी यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अर्जुन मैंद्रे यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली यामध्ये अर्जुन मैंद्रे, अशोक जमादार, मिथुन मोहन राठोड व आरोपी स्व:ता गंभीर जखमी  झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी अर्जुन मैंद्रे यांनी दि.09.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 वाशी  : आरोपी नामे-1) अशोक मुकूंद मोरे, वय 40 वर्षे रा. रा. सारोळा मा. ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि. 08.09.2023 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे टमटम क्र एमएच 25 ईके 1402 हा सारोळा मा. येथील मुख्‌य चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे-1) शिवाजी देविदास गवळी, वय 45 वर्षे, रा. पिंपळगाव ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी दि. 08.09.2023 रोजी 11.40 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे कंपनीचा टमटम क्र एमएच 16 पी 2758 हा  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ओंकार किराणा दुकानासमोर ता. वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये वाशी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web