उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : काकासाहेब प्रभाकर मगर, रा. उस्मानाबाद हे दि. 12 ऑक्टोबर रोजी 11.30 वा. सु. गुरे घेउन उस्मानाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 ओलांडत होते. दरम्यान तुळजापूरकडून आलेल्या स्विफ्ट ‍डिझायर कार क्र. एम.एच. 12 क्युडब्ल्यु 2009 च्या अज्ञात चालकाने निष्काळजीपने कार चालवून काकासाहेब यांच्यासह त्यांच्या म्हशीला धडक दिली. या अपघातात ती म्हैस जागीच मयत होउन काकासाहेब हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या काकासाहेब मगर यांनी दि. 13 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 429 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : कराळी, ता. उमरगा ग्रामस्थ- आप्पाराव लवटे यांनी दि. 03 ऑक्टोबर रोजी 16.30 वा. कराळी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ऑटोरिक्षा निष्काळजीपने चालवल्याने पलटला. या अपघातात रिक्षातील प्रवासी- रमेश कांबळे, रा. कराळी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या रमेश कांबळे यांनी दि. 13 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

मुरुम : जुगार चालू असलेल्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी दि. 13 ऑक्टोबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत आलुर ग्रामस्थ- दयानंद जेउरे, अभिमन्यु दुधभाते, अनिल देवकर, दयानंद इरकले, अशोक कुंचगे, जब्बार जामगे हे सर्वजण आलुर शिवारातील एका झाडाखाली तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 85,930 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. तर दुसऱ्या घटनेत आष्टामोड येथील एका दुकानाच्या आडोशाला संजय कांबळे, रा. लोहारा व धनराज कुंभार, रा. जळकोट हे दोघे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 390 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले.  यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

येरमाळा  : दिलीप बारीकराव खुने, रा. शेलगाव, ता. कळंब हे दि. 13 ऑक्टोबर रोजी 16.30 वा. सु. गावातील कळंब रस्त्यालगतच्या मदरसा जवळ अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web