उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन जखमी 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : शिवाजी नरसिंग मुंडे, वय 65 वर्षे, रा. कोटगल्ली, उस्मानाबाद हे दि. 07 ऑक्टोबर रोजी 08.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने पाठीमागून येउन दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर अज्ञात वाहनाचा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचारकामी नेता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शिवाजी मुंडे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग : श्रीनिवास माणिक कुलकर्णी, वय 74 वर्षे, रा. नळदुर्ग हे दि. 29.09.2021 रोजी 18.00 वा. सु. व्होर्टी येथील चिकुद्रा- नळदुर्ग रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 12 जीएम 8735 ही चालवत जात होते. दरम्यान अज्ञात चालकाने मो.सा. कलम- एम.एच. 14 एफ डब्ल्यु 1105 ही निष्काळजीपने चालवून श्रीनिवास कुलकर्णी यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सचिन श्रीनिवास कुलकर्णी यांनी दि. 09 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

परंडा  : समतानगर, परंडा येथील दिपक दिक्षीत, विजय बसवंत, जिलानी मनियार, खाजामियॉ लांडगे हे चौघे दि. 09 ऑक्टोबर रोजी 14.30 वा. सु. राहत्या कॉलनीत तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व 2,200 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नेांदवला आहे.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी‍ काल दि. 09 ऑक्टोबर रोजी अवैध मद्य विक्री विरोधी 5 छापे मारुन देशी दारुच्या एकुण 58 बाटल्या मद्य व 51 लि. गावठी मद्य जप्त करुन संबंधीत 5 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध काद्यांतर्गत खालील प्रमाणे 5 गुन्हे नोंदवले आहेत.

1) आनंदनगर पोलीसांनी शहरातील दत्तनगर परिसरात छापा मारला असता संगिता काळे या आपल्या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

2) मुरुम पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी छापे मारले असता यात पहिल्या घटनेत विजय शिरसे, रा. मुरुम हे गावातील बस थांब्यासमोर 10 लि. गावठी दारु बाळगले तर दुसऱ्या घटनेत शिराज खैराटे, रा. आष्टाकासार हे गावातील नांदुर्गी चौकात 9 लि. गावठी दारु बाळगले असतांना आढळले.

3) कळंब पोलीसांनी बोर्डा येथे छापा मारला असता ग्रामस्थ- बालाजी काळे हे गावातील धानोरा (शे.) रस्त्याकडेला 17 लि. गावठी दारु बाळगले असतांना आढळले.

4) शिराढोन पोलीसांनी घारगाव येथे छापा मारला असता ग्रामस्थ- परमेश्वर साळुंके हे गावातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 58 बाटल्या बाळगले असतांना आढळले.

From around the web