उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

ढोकी : दाउतपुर, ता. उस्मानाबाद येथील बंकट शिंदे, राजाभाउ शिंदे, सौरभ शिंदे, संपत थोरात, पांडुरंग मदने या सर्वांनी जुन्या वाद उकरुन काढून दि. 07.01.2022 रोजी 12.00 वा. सु. गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर व विठ्ठलरुक्माई मंदीरासमोर ग्रामस्थ- तानाजी लक्ष्मण ठवरे यांसह त्यांच्या भावास शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तानाजी ठवरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : भिमनगर, परंडा येथील शुभम बाळासाहेब कांबळे हे दि. 06.01.2022 रोजी 21.00 वा. सु. परंडा शिवारातील लक्ष्मीआई मंदीराजवळ थांबले होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या मुंगशी, ता. माढा, जि. सोलापूर येथील इंद्रजित महाडीक व नितीन महाडीक या दोघांनी जुना वादा उकरुन काढून शुभम कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गज, चाकु, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शुभम कांबळे यांनी दि. 07 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 आणि ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात 

तुळजापूर : चालक- शुभम सुनिल छत्रे, रा. तुळजापूर यांनी दि. 09.03.2021 रोजी 16.30 वा. सु. तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटल समोरील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 -3909 ही निष्काळजीपने चालवल्याने तीर्थ (खु.), ता. तुळजापूर येथील उत्तम धोंडीबा मिटकरी हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एबी 5922 ला डाव्या बाजूने धडकली. या अपघातात उत्तम मिटकरी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या उत्तम मिटकरी यांनी दि. 07 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web