उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

ढोकी : शेतातील बंद रोहित्राच्या वीज बिलापोटी वर्गनीचे पैसे देण्याच्या कारणावरुन तेर ग्रामस्थ- बिरु कोकरे, गुरुनाथ कोकरे, अभिमान कोकरे, सोमनाथ कोकरे, सचिन कोकरे, आकाश कोकरे यांनी दि. 26.12.2021 रोजी 11.30 वा. सु. तेर येथे भाऊबंद- भिमा कोकरे यांसह त्यांचा मुलगा- अविनाश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अविनाश कोकरे यांनी दि. 28 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 144, 147, 149, 323, 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : दत्तनगर, उस्मानाबाद येथील मुन्या जाधव व मोन्या जाधव या दोघांनी जुन्या वादावरुन दि. 28.12.2021 रोजी 18.00 वा. सु. उस्मानाबाद येथील पल्स हॉस्पीटलसमोरील रस्त्यावर आमृतनगर, उस्मानाबाद येथील नागेश पोपट खिलारे यांसह संतोष जाधव यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान करुन मनगटातील कडे नागेश यांच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या नागेश खिलारे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मद्य विरोधी कारवाई

नळदुर्ग  : मानमोडी, ता. तुळजापूर येथील विनोद दत्तु कदम हे दि. 28.12.2021 रोजी 15.30 वा. सु. आपल्या घराबाजूस 180 मि.ली. क्षमतेच्या 21 बाटल्या देशी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
                                                                                               

From around the web