उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : अमृतनगर, उस्मानाबाद येथील शकील मैनुद्दीन शेख हे दि. 21.12.2021 रोजी 18.30 वा. सु. कॉलनीतून पायी जात असतांना एका मोटारसायकलवर आलेल्या कॉलनीतीच- सद्दाम पठाण, सलमान पठाण, चाँद पठाण यांनी शकील शेख यांना पाठीमागून मो.सा. चा धक्का दिला. तसेच नमूद तीघांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून शेख शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी मारहान करुन चाकूने हातावर, पाठीवर वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शकील शेख यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण : हासेगाव, ता. कळंब येथील जनार्धन राजाराम राऊत व बालाजी राउत हे दोधे पिता- पुत्र गौरगाव, ता. कळंब ग्रामस्थ- अविनाश शिरीष पाटोळे यांना वेळोवेळी फोनद्वारे, भेटून शिवीगाळ करुन धमकावत होते. यावर अविनाश पाटोळे यांनी दि. 20.12.2021 रोजी 09.00 वा. सु. हासेगाव येथे ग्रामपंचायत समोर असतांना राउत पिता- पुत्रांस त्याचा जाब विचारला असता त्यांनी पाटोळे यांना शिवीगाळ करुन लाकडी फळी डोक्यात मारुन पाटोळे यांना गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या अविनाश पाटोळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506, 507, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

From around the web