कळंब तालुक्यात हाणामारीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

कळंब : गणेशनगर, कळंब येथील ओमप्रकाश शामराव सारुक, वय 27 वर्षे हे दि. 23.12.2021 वा. सु. 22.30 वा. सु. कळंब येथील शुभ मंगल कार्यालयासमोरील रस्त्याकडेला मोटारसायकल लाउन नातेवाईकांची वाट पहात थांबले होते. यावेळी गावकरी- दत्ता आडसुळ, समिर यांसह दोन अनोळखी पुरुषांनी तेथे जाऊन, “तु इथे का थांबलास, हा एरिया आमचा आहे.” असे धमकावून सारुक यांच्या मो.सा. ची चावी काढून घेतली. तसेच त्या चौघांनी सारुक यांना ठार मारण्याच्या उद्देशाने लाथाबुक्क्यांनी, दगडाने धारदार हत्याराने मारहान करुन गंभीर जखमी केले व सारुक यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम सुवर्ण साखळीसह बोटातील 10 ग्रॅम च्या दोन सुवर्ण अंगठ्या काढून घेतल्या. अशा मजकुराच्या ओमप्रकाश सारुक यांनी दि. 25 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 394, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत ईटकुर, ता. कळंब येथील गोविंद साहेबराव गंभीरे यांसह त्यांची पत्नी- आशाबाई असे दि. 25.12.2021 रोजी 07.00 वा. सु. आपल्या घरात असतांना मुलगा-किरण गोविंद गंभीरे व सुन- शोभा किरण गंभीरे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन गोविंद यांसह आशाबाई यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली. तसेच ठार मारण्याची धमकी देउन घराबाहेर काढले. अशा मजकुराच्या गोविंद गंभीरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 341, 323, 504, 506, 34 सह ज्येष्ठ नागरिक अधिनियम कलम- 24 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

                                                                          

From around the web