उस्मानाबादेत चोरीच्या दोन घटना

उस्मानाबाद : उस्मानाबाद येथील शोभा अहिरे या दि. 01.11.2021 रोजी 14.00 वा. उस्मानाबाद बस स्थानकातील बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने त्यांची पर्स उघडून आतील 30 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 10,000 ₹ रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या शोभा अहिरे यांनी दि. 04.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद : सांजा चौक, उस्मानाबाद येथील अकबर शेख यांनी त्यांच्या घराच्या पडवीतील 30 पोती सोयाबीन अज्ञात व्यक्तीने दि. 03- 04.11.2021 दरम्यानच्या रात्री चोरुन नेली. अशा मजकुराच्या अकबर शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : तेरखेडा येथील अजय बळीराम माने हे दि. 04.11.2021 रोजी रात्री घरात झोपलेले असतांना 4 अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराच्या लोखंडी दरवाजाचे व स्वयंपाक घराच्या दाराचे कुलूप गुपचूपपणे तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरांनी अजय यांसह त्यांची पत्नी व आजी यांस मारहान करुन, धाक दाखवून नमूद दोन्ही महिलांच्या अंगावरील 25 ग्रॅम सुवर्ण दागिन्यांसह 1,00,000 ₹ रोख रक्कम व बाजूच्या किराणा दुकानातील 10,000 ₹ किंमतीच्या साहित्यासह दारुच्या बाटल्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या अजय माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.