उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

तुळजापूर : तुळजापूर येथील स्टेट बँक ऑफ इंडीया समोर सिंदफळ, ता. तुळजापूर ग्रामस्थ- देवीदास अर्जुन क्षिरसागर यांनी दि. 13.01.2021 रोजी 12.15 ते 12.25 वा. दरम्यान  मोटारसायकल उभी करुन ठेवली होती. त्या मोटारसायकलला पाठीमागील बाजूस अडकवलेली 99,500 ₹ रकमेची पिशवी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या देवीदास क्षिरसागर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : माडज, ता. उमरगा येथील मोहन ज्ञानदेव काळे, वय 60 वर्षे यांचा मोटारसायकलवर प्रवास करत असतांना अपघात झाल्याने ते उमरगा येथील ईस्पीतळात वैद्यकीय उपचारकामी दाखल आहेत. माडज फाटा येथील अपघात स्थळावरील त्यांची स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 व्ही 7169 ही दि. 12.01.2022 रोजी 09.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या मोहन काळे यांनी दि. 13 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
उस्मानाबादेत फसवणूक 

उस्मानाबाद  : वकील कॉलनी, उस्मानाबाद येथील पुरोहीत- चंद्रकांत रामचंद्र महाजन हे  दि. 13.01.2022 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद एमआयडीसी मधील एका रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवरील एका अनोळखी पुरुषाने पोलीस असल्याची बतावणी करुन चंद्रकांत यांना त्यांच्या हातातील अंगठी रुमालात बांधून खीशात ठेवण्यास सांगीतले. यावर चंद्रकांत यांनी त्या पुरुषास आपली 5 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी व रुमाल दिला असता त्याने ती अंगठी रुमालात गुंडाळल्याची हातचलाखी करुन फक्त गुंडाळलेला रुमाल चंद्रकांत यांना देउन ती अंगठी घेउन निघून गेला. थोड्या वेळाने चंद्रकांत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. अशा मजकुराच्या चंद्रकांत महाजन यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 170 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web