उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

उमरगा  : बलसुर, ता. उमरगा येथील अश्विनी अमरसिंह पाटील यांच्या बंद घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 28- 29.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री तोडून घरातील 21 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 2.5 कि.ग्रॅ. वजनाचे चांदीचे दागिने- वस्तू व रोख रक्कम 50,000 ₹ रक्कम चोरुन नेली. तसेच ग्रामस्थ- पदमाकर सिद्राम पंचमहाल यांच्याही सराफ दुकानात चोरी झाल्याचे पाटील यांना समजले. अशा मजकुराच्या अश्विनी पाटील यांनी दि. 29 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : शिंगोली, ता. उस्मानाबाद येथील सुनिल भागवत शितोळे यांच्या बंद धराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 28.12.2021 रोजी 10.00 ते 16.30 वा. दरम्यान तोडून घरातील 13,500 ₹ रक्कम व एक स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुनिल शितोळे यांनी दि. 29 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

उमरगा  : कवठ, ता. उमरगा येथील भागवत तातेराव पाटील, वय 42 वर्षे हे दि. 24.12.2021 रोजी 19.00 वा. सु. नारंगवाडी येथील रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 25 आर 5854 ही निष्काळजीपने चालवल्याने भागवत यांना समोरुन धडकल्याने त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले आहे. या अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या भागवत पाटील यांनी दि. 29 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web