उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

उमरगा : वसीम बशीरसाब शेख, रा. हमीदनगर, उमरगा यांनी त्यांच्या घरामसोर लावलेली त्यांची स्विफ्ट डिझायर कार क्र. एम.एच. 25 आर 9313 ही दि. 17- 18 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वसीम शेख यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : जयसिंगपुर ते जालना असा जात असलेला मालवाहू मिनी ट्रक क्र. एम.एच. 09 ईएम 7330 हा दि. 17 ऑक्टोबर रोजी 23.40 वा. सु. तेरखेडा गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन जात होता. दरम्यान अज्ञात चोट्यांनी वाहनाची गती कमी झाल्याचा फायदा घेउन नमूद मिनी ट्रकच्या पाठीमागील हौद्यावरील टारपोलीन फाडून आतील 8 तुपाच खोकी, 2 खाद्यतेलाची खोकी असा एकुण 60,762 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराया चालक- विठ्ठल शिवाप्पा कडमणी, रा. कोल्हापूर यांनी दि. 19 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद  : नानीबाई लक्ष्मण काळे, रा. तांदुळवाडी, ता. वाशी या दि. 19 ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घराजवळ 9 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

दुसऱ्या घटनेत दलीत किसन बागडे, रा. टेलननगर, ता. तुळजापूर हे राहत्या परिसरातील त्यांच्या पानटपरीबाजूस 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 22 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

तिसऱ्या घटनेत स्था.गु.शा. च्या पथकास शशिकांत नवनाथ भालेराव, रा. तुळजापूर हे तुळजापूर- औसा रस्त्यालगतच्या सार्थक हॉटेलमध्ये 180 मि.ली. देशी- विदेशी दारुच्या 30 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले.

From around the web