धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना 

 
crime

  धाराशिव  : फिर्यादी नामे- आनंद उदाराम निखारे, वय 40 वर्षे, रा. पवणी जि. भंडरा हा.मु. चंदनशिवे यांचे घरी स्वामी समर्थ जवळ शाहुनगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांचे शाहुनगर उस्मानाबाद येथील मधुकरराव भानुप्रताप तावडे यांचे सर्वे नं 116/08 मधील प्लॉट क्रं 20 मध्ये बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी तयार केलेले विटाचे शेडचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन लक्ष्मी कंपनीची मोटर, केबल 55 फुट,प्लॉस्टिक पाईप 100 फुट, इायब्रेटर आयडेल कंपनीचे, ग्राईडर डेव्हॉल्ट कंपनीचे  बांधकाम साहित्य असा एकुण 14,750₹ किंमतीचा माल  हा दि.30.07.2023 रोजी. 01.00  वा. सु. दोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या आनंद निखारे यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457,380,37 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  :  फिर्यादी नामे- वैभव पुष्कल माळकर, वय 37 वर्षे रा. कोथळी हा.मु. हिंगणगाव पाटी ता. कळंब जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 24 वाय 2090 ही. दि.22.07.2023 रोजी 10.30 ते दि.23.07.2023 रोजी 07.00 वा. सु. हिंगणगाव पाटी ता. कळंब जि. उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वैभव माळकर यांनी दि.30.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web