धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या दोन घटना
धाराशिव : टिपीएस रोड, बार्शी नाका, उस्मानाबाद येथील- बापू जंगल तौर यांचा अंदाजे 4,00₹ किंमतीचा एम आई कंपनीचा मोबाईल हा दि.25.05.2023 रोजी 03.30 वा. दरम्यान अप्पाराजे कुमुदराव राजेनिंबाळकर कॉम्प्लेक्स उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बापु तौर यांनी दि. 25.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा : मुंबई येथील- विद्या रमेश राऊत यांचे अंदाजे 70,000 ₹ किंमतीचे 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे हे दि.23.05.2023 रोजी 15.30 वा. सु. येडेश्वरी मंदीर परिसर येरमाळा येथे गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या विद्या राऊत यांनी दि.25.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
शिराढोण : सैंदाणा अंबा, ता. कळंब येथील- युवराज गायकवाड, संकेत गायकवाड, विष्णु गायकवाड, शैलेश गायकवाड, विनोद गायकवाड, आन्य 3 या सर्वांनी दि.25.05.2023 रोजी 11.00 वा. दरम्यान बेकायदेशीररित्या गैरकायद्याची मंडळी गावकरी- महादेव कुंडलिक गायकवाड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट मारुन जखमी केले. महादेव यांच्या पत्नी राधाबाई ह्या त्यांच्या बचावास आल्या असता त्यासही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या महादेव गायकवाड यांनी दि.25.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-143, 147, 149, 324,323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.