धाराशिव जिल्ह्यात हाणामारीच्या दोन घटना 

तामलवाडी आणि उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 
 
crime

तामलवाडी  : आरोपी नामे-1) गणेश धनाजी क्षिरसागर, 2) नागेश धनाजी क्षिरसागर, 3) धनाजी तुकाराम क्षिरसागर, अनोळखी 3 सर्व रा. कुंभारी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी जनावरे बांधण्याचे कारणावरुन दि. 30.09.2023 रोजी 11.15 ते 11.30 वा. सु. कदमवाडी शिवार गट नं 195 मधील पडीक रानात फिर्यादी नामे- समीर पांडुरंग पाटील, वय 49 वर्षे, रा. कदमवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना गैरकायद्याची मंडळी जमवून नमुद आरोपींनी जनावरे बांधण्याचे कारणावरुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. तसेच सचिन पाटील व ज्ञानेश्वर कदम हे फिर्यादी यांचे बचावास आले असता नुमद आरोपीनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या समीर पाटील यांनी दि.30.09.2023 रोजी दिलेल्या वैद्याकीय जबाबावरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1)राजु खुबा पवार, 2) डिंपल राजु पवार, 3) शितल राजु पवार, 4) शैला राजु पवार, सर्व रा. कोळसुर तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी मागील भांडणाचे कारणावरुन दि. 28.09.2023 रोजी 10.30 वा. सु. जयसिंग पवार यांचे कराळी शिवारातील शेतामध्ये फिर्यादी नामे- सुनिता धगन चव्हाण, वय 45 वर्षे रा. दयानंद नगर, कोळसुर तांडा, ता. उमरगा जि. धाराशिव  यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुनिता चव्हाण यांनी दि.30.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अपघातात एक ठार              

तुळजापूर  : मयत नामे- लहु दगडु काळुंखे, वय 50 वर्षे, रा. रा. दहीवडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि. 12.09.2023 रोजी 19.30 वा. सु. सोलापूर तुळजापूर रोडने तुळजापूरकडे मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 9481 वरुन सिंदफळ पाटीवरील उड्डानपुलाचे जवळुन जात होते. दरम्यान आयशर ट्रक क्र जीजे 04 एआय 6075 चा अज्ञात चालकाने त्याचे ताब्यातील आयशर ट्रक ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून लहु काळुंखे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात लहु काळुंखे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी आकाश लहु काळुंखे, वय 27 वर्षे, रा. दहीवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.30.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304 (अ) सह मो.वा. का. कलम 134 (अ), (ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web