उस्मानाबाद जिल्ह्यात मारहाणीच्या दोन घटना 

 
Osmanabad police

तामलवाडी : विनोद सुरेश नरवडे, रा. मसला (खु), ता. तुळजापूर यांनी आपल्या घरासमोर मुरुम टाकल्याने शेजारील- रतन प्रभाकर जाधव यांच्या दारात पाणी साचू लागले. या कारणावरून दि. 27 सप्टेंबर रोजी 07.30 वा. सु. राहत्या गल्लीत रतन यांसह लक्ष्मण जाधव, सुग्रीव जाधव, नागनाथ जाधव, रुक्मिण जाधव, स्वाती जाधव, सुरेखा जाधव अशा सातजणांनी विनोद यांसह त्यांची आई व भावजय यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केली. तसेच रतन यांनी विनोद यांच्या उजव्या खुब्यास चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या विनोद नरवडे यांनी दि. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : सिध्दु कुनाळे, रा. कदेर, ता. उमरगा हे दि. 29 सप्टेंबर रोजी 19.00 वा. सु. गावातील रस्त्याने पायी फेरफटका मारत होते. दरम्यान ग्रामस्थ- रंजित पवार यांनी मोटारसायकलवर येउन त्यांना हुलगावनी दिल्याने कुनाळे यांनी पवार यांस जाब विचारला. यावर पवार यांनी चिडून जाउन कुनाळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हंटरने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कुनाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


विनयभंग

उस्मानाबाद  : एक तरुण गावातीलच एका 17 वर्षीय मुलीचा (नाव- गाव गोपनीय) काही दिवसांपासून पाठलाग करुन अश्लील ईशारे करत होता. दि. 28 सप्टेंबर रोजी 17.30 वा. सु. ती मुलगी तीच्या मैत्रीणीच्या घरी जात असतांना त्या तरुणाने मोटारसायकलने तीचा पाठलाग करण्यास सुरवात केली. आजूबाजुस कोणी नसल्याची संधी साधून त्याने वाईट हेतूने त्या मुलीचा हात धरुन तीचा विनयभंग केला. यावर त्या मुलीच्या पालकांनी त्यास जाब विचारला असता त्याने त्यांना अश्लील शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधती मुलीने दि. 29 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 509, 504, 506 सह पोक्सो कायदा कलम- 11, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web