अंबीतील दोन जुगाऱ्यांना आर्थिक दंडाची शिक्षा

 
Osmanabad police

अंबी  : जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी दिनकर पोपट गोळे, रा. आनाळा व पंजाब सर्जेराव कवडे, रा. वाशी यांना प्रत्येकी 300 ₹ दंड व दंड न भरल्यास पाच दिवस साध्या कारावासाची शिक्षा आज दि. 01 ऑक्टोबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी सुनावली आहे.


जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद - जुगार चालू असल्याच्या गोपनीय माहितीवरुन उमरगा पोलीसांनी दि. 30 सप्टेंबर रोजी हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात नारंगवाडी ग्रामस्थ- ज्ञानोबा भैरुबा चिकुंदरे हे नारंगवाडी फाटा येथील एका पत्रा शेडसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 760 ₹ रोख रक्कम बाळगलेले तर नाईचाकूर ग्रामस्थ- जितेंद्र गणपती कांबळे हे आपल्या राहत्या घरासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 670 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. तसेच तुळजापूर पोलीसांना किरण रामभाऊ बागडे, रा. हाडको, तुळजापूर हे शहरातील एका हॉटेलसमोर मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,200 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना आढळले. यावरुन नमूद तीघांविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद - अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन तुळजापूर पोलीसांनी काल दि. 30 सप्टेंबर रोजी हद्दीतील सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात 1)विष्णू आंबादास राउत, रा. तुळजापूर हे शहरातील नवीन बसस्थानकाजवळ 40 लि. शिंदी अंमलीद्रव्य बाळगलेले आढळले. 2)लैला पवार, रा. विजनवाडी या राहत्या घरासमोर 15 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या. 3)इरफान शेख, रा. तुळजापूर हे शहरातील जुने बसस्थानकजवळ 180 मी.ली. देशी दारुच्या 22 बाटल्या बाळगलेले आढळले. 4)धर्मेद्र मस्के, रा. देवसिंगा (तुळ) हे आपल्या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले. 5)भैय्या परीट, रा. कमानवेस, तुळजापूर हे राहत्या गल्लीत 2,285 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्य बाळगलेले आढळले. 6)राम क्षिरसागर, रा. तुळजापूर हे जुने बसस्थानकजवळ 180 मी.ली. देशी दारुच्या 96 बाटल्या बाळगलेले आढळले.

            तसेच कळंब पो.ठा. च्या पथकास तोळाबाई पवार, रा. शेळी बाजार मैदान, कळंब या राहत्या घरासमोर 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगल्या असतांना आढळल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद सर्वांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web