धाराशिवमध्ये दोन मद्यपी चालकावर गुन्हा दाखल 

 
crime

 धाराशिव  : खेर्डा, ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील- नानासाहेब फकीर जाधव, वय 28 वर्षे  हे दि. 13.08.2023 रोजी 23.35 वा. सु. येडशी येथील दिल्ली दरबार चौकामध्ये लातुर बार्शी रोडवर आपल्या ताब्यातील वाहन क्र. एम.एच. 12 सीआर 7629 हे मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांना आढळले. तर तेर, ता. जि. उस्मानाबाद येथील- विकाश शिवाजी खोटे, वय 30 वर्षे  हे दि. 13.08.2023 रोजी 23.45 वा. सु. लातुर ते बार्शी रोडवर त्यांचे ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच. 14 सी एक्स 9130 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांना आढळले. तर येडशी ता.  जि. उस्मानाबाद येथील- सुरज मनोज शिंदे, वय 28 वर्षे  हे दि. 13.08.2023 रोजी 23.55 वा. सु. जनता विद्यालय ते बस स्थानक येडशी कडे जाणारे रोडवर आपल्या ताब्यातील वाहन क्र. एम.एच. 25 डी 7285 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना उस्मानाबाद ग्रामीण पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो ठाणे येथे मो.वा.का. कलम- 185 अन्वये स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

कळंब  : इंदीरानगर, कळंब ता. कळंब जि. उस्मानाबाद येथील- फेरोज मुस्सा शेख, वय 38 वर्षे  हे दि. 13.08.2023 रोजी 23.56 वा. सु. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रोडवर आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एम.एच.44 ई 1869 ही मद्यधुंद अवस्थेत चालवत असताना कळंब पोलीसांना आढळले यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे मो.वा.का. कलम- 185 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

उमरगा  : आरोपी नामे-1) शिवलिंग बसय्या स्वामी, वय 26 वर्षे, रा. काळे प्लॉट, उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि. 14.08.2023 रोजी 13.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 0670 हा एन एच 65 रोडवर आरोग्य कॉर्नर जवळ डिव्हायडरच्या बाजूस सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे- 2) मोहन श्रीरंग कांबळे, वय 50 वर्षे, रा. शास्रीनगर उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 13.45 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 0839 हा एनएच 65 रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

लोहारा  : आरोपी नामे-1) समाधान शिवाजी सुरवसे, वय 25 वर्षे, 2) हरीदास भिमा चव्हाण, वय 25 वर्षे, 3) समाधान शिवाजी सुरवसे, वय 25 वर्षे रा. पेठसांगवी, ता.उमरगा जि. उस्मानाबाद या तिघांनी दि. 14.08.2023 रोजी 12.00 ते 13.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 1379, व इतर दोन वाहने ही  होळीपाटी चौकात पेठसांगवी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

मुरुम : आरोपी नामे-1) महेश पांडुर्रग पवार, वय 24 वर्षे, 2) राहुल दिलीप हेडे, वय 33 वर्षे, दोघेही रा. सुंदरवाडी, ता.उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी 18.10 ते 18.30 वा. सु. आपआपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 44 ए 3781,  ॲपे रिक्षा क्र एमएच 44 एम 1815 हे नाईकनगर बसस्थानक समोरील सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. तर आरोपी नामे- नागेश्वर लक्ष्मण खंडागळे रा. महालिंगरायवाडी, ता. उमरगा जि.  उस्मानाबाद यांनी याच दिवशी 14.45 वा. सु. एनएच 65 रोडवर येणेगुर बस स्थानक येथे आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 16 एबी 5327 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. तर  आरोपी नामे 4) दस्तगीर ईस्माईल मुजावर, वय 49 वर्षे रा. मुगाव ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी याच दिवशी 15.25 वा. सु. एनएच 65 रोडवर येणेगुर बस स्थानक येथे आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 704 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना मुरुम पोलीसांना मिळून आले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

बेंबळी  : आरोपी नामे-1) इमाम अहमद वजीर पठाण, वय 35 वर्षे, रा. रुईभर, ता. जि. उस्मानाबाद यांनी  दि. 14.08.2023 रोजी 10.45 वा. सु. आपल्या ताब्यातील टाटा मॅजीक क्र एमएच 25 आर 3794 हा  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभा केले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web