अवैध गुटखा विक्री प्रकरणी दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव - रामनगर, ता. जि. उस्मानाबाद येथील- सतीश बळीराम शितोळे, वय 43 वर्षे हे दि. 05.09.2023 रोजी 13.30 वा. सु. खाजानगर भागात राजधानी हॉटेल समोर उस्मानाबाद येथे अंदाजे 23,801 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु, गोवा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले उस्मानाबाद शहर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द. सं. कलम- 328, 188, 272, 273  अंतर्गत उस्मानाबाद शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :महादेव गल्ली, उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद येथील- श्रीकांत भिमराव वह्राडे, वय 50 वर्षे हे दि. 05.09.2023 रोजी 14.00 वा. सु. गुंजोटी ते औराद पाटी रोडलगत ऐश्वर्या बार पासून 200 मीटर वर औराद पाटी येथे अंदाजे 89,920 रु किंमतीचा महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखु, गोवा गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेले उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी प्रतिबंधीत गुटखा व तत्सम पदार्थासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द. सं. कलम- 328, 188, 272, 273  अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक 

धाराशिव  : फिर्यादी नामे-लक्ष्मीबाई महादेव काकडे, वय 75, वर्षे, रा. नितळी ता. जि. उस्मानाबाद यांचे दि.22.06.2023 ते 26.06.2023 रोजीच्या दरम्यान महाराष्ट्र ग्रामीण बँक,शाखा- कोंड ता. जि. उस्मानाबाद येथे खाते क्र 54412003865 यामधून युपीआय चालु करुन लक्ष्मीबाई काकडे यांचे खात्यावरुन अंदाजे 98446₹ ऑनलाईन पध्दतीने अज्ञात व्यक्तीने काढून घेवून त्यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी लक्ष्मीबाई काकडे यांनी दि.05.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो. 

From around the web