उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

कळंब : धानोरा (देव), ता. कळंब येथील तुकाराम चंद्रकांत काळे यांनी दि. 10 सप्टेंबर रोजी 23.00 वा. सु. साठे चौक, कळंब येथे शहरातील- बबन बन्सी पवार यांना आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहान केल्याने यात बबन पवार यांचा ताद पडून ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या बबन पवार यांनी दि. 12 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उस्मानाबाद  : अमन शेख, सलीम शेख, रा. रा. ख्वॉजानगर, उस्मानाबाद हे दि. 12 सप्टेंबर  रोजी 19.40 वा. सु. राहत्या गल्लीत गोंधळ करत असतांना गल्लीतीच निहाल माजिद काझी यांनी त्या दोघांना हटकले. यावर चिडून जाउन त्या दोघांनी निहाल काझी यांना शिवीगाळ करुन दगडाने डोक्यात, खांद्यावर मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या निहाल काझी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

विनयभंग

उस्मानाबाद  : एका गावातील 15 व 13 वर्षीय दोन बहीनी (नाव- गाव गोपनीय) दि. 11 सप्टेंबर रोजी 08.00 वा. सु. शिकवणीस जात असतांना गावातीलच 3 तरुणांनी मोटारसायकलने त्या दोघींचा पाठलागकरुन त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करुन त्यांचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या त्या मुलींच्या आईने दि. 12 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 34 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web