उमरग्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उमरगा  : फिर्यादी नामे- महेंद्र श्रीकिसनजी चोकडा, वय 50 वर्षे रा. गुरुवार पेठ अंबेजोगाई जि. बिड ह.मु. चालुक्य कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची मोटरसायकल क्र एमझेडण्स 1909 यामाहा आर एक्स 100 कंपनीची जिचा चेसी नं 1l1-075886 इंजिन नं- 1 l 1 075688 ही दि.05.08.2023 रोजी 23.00 ते  दि.06.08.2023 रोजी 06.00 वा. सु. महेंद्र चोकडा यांचे राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या महेंद्र चोकडा यांनी दि.07.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : फिर्यादी नामे- धनाजी हरिश्च्ंद्र जोगदांडे, वय 31 वर्षे, रा. गुंजोटी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे दि.07.08.2023 रोजी 19.35 वा. सु. बसस्थानक उमरगा येथे उमरगा ते लातुर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून गणेश विश्वनाथ उपळेकर, रा. जोशीनगर, भालकी, ता. भालकी, जि. बिदर यांनी धनाजी जोगदांडे यांचे पॅन्टच्या मागील खिशातील व आधार कार्ड, पॅन कार्ड, ए. टी. एम कार्ड, रोख रक्कम  1,500 ₹किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या धनाजी जोगदांडे यांनी दि.07.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात उमरगा पो ठाणे च्या पथकाने उमरगा बसस्थानक येथे संशईत आरोपी नामे गणेश विश्वनाथ उपळेकर, रा. जोशीनगर, भालकी, ता. भालकी, जि. बिदर यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. व त्याचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 


बेंबळी  : फिर्यादी नामे-नेताजी बळीराम सुरवसे, वय 34 वर्षे, रा. आंबेवाडी ता. जि. उस्मानाबाद यांचा अंदाजे 7,000₹ किंमतीचा रेड मी नोट 9 कंपनीचा मोबाईल हा दि.12.07.2023 रोजी 12.00 ते दि.13.07.2023 रोजी 06.00 वा. सु.आंबेवाडी शेत गट नं 228 येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या नेताजी सुरवसे यांनी दि.07.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.                                                        

From around the web