धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

भूम, कळंब पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद 
 
crime

भूम   : फिर्यादी नामे- सुधीर नारायण साळुंखे, वय 55 वर्षे, रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचे अज्ञात व्यक्तीने दि. 24.09.2023 रोजी 00.30ते 04.00 वा. पुर्वी करुन देवीच्या पालखी रुमचा दरवाज्याचे  कुलूप तोडून आत प्रवेश करुन पेटीतील चांदीचा देवीचा मुकुट, पितळाची परात, तांब्याचा कलश,पितळाची आरती,घंटी,निरंजन वकरंड असा एकुण 8,200 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी सुधीर साळुंखे यांनी दि.27.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-457,380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : फिर्यादी नामे- विक्रम रावसाहेब चंदनशिवे, वय 45 वर्षे, रा. भोपला, ता. केज जि. बीड यांची अंदाजे 35, 000 ₹ किंमतीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एमएच 14 जीएम 2743 ही दि.25.09.2023 रोजी 15.00 ते 17.00 वा. सु. सुकळंब येथील नगर पालिकेच्या शेजारी असलेल्या बारकुल मेडीकल समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी विक्रम चंदनशिवे यांनी दि.27.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बोरगाव राजे येथे हाणामारी 

बेंबळी  : आरोपी नामे-1)वंसत विश्वंभर सरवदे,2) दादा विश्वंभर सरवदे, 3) राधाबाई विश्वंभर सरवदे सर्व रा. बोरगाव राजे, ता. जि. धाराशिव यांनी दि.27.09.2023 रोजी 11.00 वा. सु. राजे बोरगाव येथे फिर्यादी नामे- सुप्रिया आकाश कांबळे, वय 28 वर्षे, रा. दर्गा रोड, वैराग नाका, धराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीनी आर्थिक व्यव्हाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. शालीनी गोरबा हावले या सुप्रिया यांचे बचावास आले असता त्यांनाही नमुद आरोपीनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी सुप्रिया कांबळे यांनी दि.27.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

           

From around the web