धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल
तामलवाडी : फिर्यादी नामे- सोमनाथ अशोक वाडेकर, वय 32 वर्षे, रा.वाणेवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 17.09.2023 रोजी 00.30 ते 06.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील पत्रयाची पेठी व त्यामधील 63 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 30 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकुण 1,95,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी सोमनाथ वाडेकर यांनी दि.17.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : फिर्यादी नामे- बाबुराव रंगनाथ गायकवाड, वय 56 वर्षे, रा.सरमकुंडी, ता. वाशी जि. धाराशिव यांचे शेतातील राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 16.09.2023 रोजी 11.00 ते सायंकाळ 07.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लाकडी शोकेस मधील ठेवलेले 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 6,000 ₹ असा एकुण 47,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी बाबुराव गायकवाड यांनी दि.17.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
तुळजापूर : आरोपी नामे-1)शरद अरुण जगदाळे, 2)विलास बाजीराम जगदाळे, 3) विराज विलास जगदाळे, 4) शिवराज अरुण जगदाळे, 5) जयाजी उर्फ राजेंद्र बाजीराव जगदाळे सर्व रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 17.09.2023 रोजी 11.30 वा. सु. तुळजाभवानी मंदीर तुळजापूर खुर्द येथे फिर्यादी नामे-आनंद बाबुराव माळी, वय 44 वर्षे, रा. तुळजापूर खुर्द ता. तुळजापूर जि. धाराशिव हे देवी भक्ता कडुन सिंहासन पुजा केली सदर देवी भक्ताकडून सिंहासन पुजाचे 551₹ ची पावती का फाडली नाही या कारणावरुन नमुद आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व फिर्यादीचा पुतण्या यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी आनंद माळी यांनी दि.17.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.