धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 
 

 
crime

ढोकी  : फिर्यादी नामे- बलभिम माधव गरड, वय 55 वर्षे, रा. कोंड, ता.जि. उस्मानाबाद व भिमराव जाधव या दोघांचे कोंड येथील शेतातील दोघांचे मिळून दोन म्हशी व दोन वगार काळ्या रंगाच्या असे एकुण 1,00,000 ₹ किंमतीच्या म्हशी दि.09.09.2023 रोजी 18.00 वा. सु. दि.10.09.2023 रोजी 04.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी बलभिम गरड यांनी दि.11.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी  : फिर्यादी नामे- अभिषेक दत्तात्रय गुंड, वय 24 वर्षे, रा. पाडोळी, ता. जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची टीव्हीएस स्पोर्ट मोटरसायकल क्र एमएच 24 एआर 0036 ही दि.30.08.2023 रोजी 23.00 वा. सु. दि.31.08.2023 रोजी 05.00 वा. सु. रामेश्वर बालाजी घोडके यांचे घरासमोर पाडोळी उभी केलेली अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी अभिषेक गुंड यांनी दि.11.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  रस्ता अपघात

येरमाळा  :आरोपी नामे-सिध्देश्वर बबन घुले, व सोबत जखमी नामे- सुनिता मल्हारी बारगजे, सिध्दु बालाजी बारगजे, मच्छिंद्र रामकिसन बारगजे सर्व रा. टाकळी, ता. केज जि. बीड हे सर्वजन कार क्र एमएच 23 बीएच 5161 यामध्ये दि.29.06.2023 रोजी 05.30 ते 05.45 वा. सु. आशिर्वाद गॅस एजन्सी समोर बार्शी रोड येरमाळा येथुन जात होते. दरम्यान नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अचानक ब्रेक दाबल्याने नमुद कार ही रस्त्याचे बाजूला खड्यात जावून पलटी होवून कारचे नुकसान करुन आत मध्ये बसलेले सुनिता बारगजे, सिध्दु बारगजे, मच्छिंद्र बारगजे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी मल्हारी खंडु बारगजे, वय 59 वर्षे, रा. रा. टाकळी, ता. केज जि. बीड यांनी दि.11.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, सह मो.वा. का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                       

From around the web