धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल  

 
crime

कळंब :आरोपी नामे- भारत शंकरराव घाडगे, वय 45 वर्षे, रा.  लाखा, ता. केज जि. बीड यांनी दि.11.08.2023 रोजी 11.48 ते 12.30 वा. सु. मांजरा नदीजवळ असलेल्या तहसील बाबा ईदगाहा जवळ कळंब शिवार येथुन आपल्या ताब्यातील न्यु हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर क्र एमएच 25 एच 440 व ट्रॅली नं एमएच 25 जी 341 या मध्ये गौण खनिज वाळू एक ब्रास अंदाजे 6,000₹ किंमतीची ट्रॅक्टर सह असा एकुण 2,25,000 ₹ किंमतीचा माल हा कळंब तहसील बाबा ईदगाहा जवळील मांजरा नदीपात्रातुन अवैध्यरित्या वाळूची चोरटी वाहतुक करीत असताना कळंब पोलीसांना मिळून आला. अशा मजकुराच्या  कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस हावलदार/ 1206 राजुदास सिताराम राठोड यांनी दि.19.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 सह म.ज.म.अधि कलम 48 पोट कलम 8(1)(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  :फिर्यादी नामे- गुणवंत सिद्राम दुधभाते, वय 75 वर्षे, रा. औराद, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे उमरगा बसस्थानक येथे दि.19.08.2023 रोजी 03.00 वा. सु. बस चढत असताना गुणवंत दुधभाते यांचे हातातील पिशवी कापून अंदाजे 1,00,000₹ हे गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गुणवंत दुधभाते यांनी दि.19.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.         

From around the web