धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : फिर्यादी नामे- अभिजीत दिनकर पडवळ, वय 35 वर्षे, रा. उपळा मा. ता. जि. उस्मानाबाद यांचे घरातील कपाटातील 50 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या पाटल्या, 13 ग्रॅमची सोन्याची चैन व रोख रक्कम50,000₹ असा एकुण 2,70,500 ₹ किंमतीचा माल आरोपी नामे- तारामती शेषेराव शिरसाटे, रा. उपळा मा. ता. जि. उस्मानाबाद या दि. 13.08.2023 रोजी 19.00 ते दि.14.08.2023 रोजी 16.00 वा. सु. चोरुन नेला. अशा मजकुराच्या अभिजीत पडवळ यांनी दि.16.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 381,461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : फिर्यादी नामे- सिध्देश्वर अरविंद वाघोले, वय 30 वर्षे, रा. हंगरगा नळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे अंदाजे 30,000 ₹ किंमतीचे फालकॉन कंपनीची 5 एचपी ची मोटर, 45 फुट वायर, पॅनल बॉक्स, शक्ती कंपनीची 3 एचपी ची पानबुडी मोटर, 60 फुट केबल, हस्ती पाईप हे दि. 15.08.2023 रोजी 19.00 ते 16.08.2023 रोजी 06.00 वा. सु. हंगरगा नळ शिवारात शेत बट नं 281,236 मधील  साहित्य हे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सिध्देश्वर वाघोले यांनी दि.16.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

From around the web