उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  : ईट, ता. भुम येथील-त्रिशाला साहेबराव सांगवीकर यांच्या घराचे दि. 09.02.2023 रोजी 17.00 ते दि 10.02.2023 रोजी 19.00 वा. सु.कुलूप तोडून रोख रक्कम 2,98,218 ₹ सह 59 ग्रॅम वजनाचे  सुवर्ण दागिणे असा एकुण 4,92,590 ₹ किंमतीचा माल हा अणदुर, ता. भुम येथील मिना ओव्हळ, सुभाष ओव्हळ, वैशाली ओव्हळ यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या त्रिशाला सांगवीकर यांनी दि. 11.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 457, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : देवधानोरा, ता. कळंब येथील- अनिल मधुकर बुधवंत यांची मुलगी दि. 11.02.2023 रोजी  05.15 वा. सु. तन्ही ही किराना दुकानातुन किराणा घेउन येत होती.  देवधानोरा येथील - सागर शहाजी बोंदर हा तन्हीस म्हणाला की थांब तुझ्‌या कानातील पडयाला झाले आहे. असे म्हणून तन्हीच्या कानातील अर्धा ग्रॅमचे सुवर्ण दागिणे अंदाजे 2500 ₹ किंमतीचे चोरून नेले. अशा मजकुराच्या अनिल बुधवंत यांनी दि.11.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web