उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

उस्मानाबाद  : कासार सोसायटी, सोलापूर येथील- अमोल भाउबली जगधने, यांच्या सासु स्नेहलता नळे ह्या दि.03.02.2023 रोजी 19.00 वा.सु.उस्मानाबाद बसस्थानक येथे बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन स्नेहलता नळे यांच्या पर्समधील अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीचे 100 ग्रॉम वजनाचे सुवर्ण दागिने स्नेहलता यांच्या नकळत चोरुन नेले. अशा मजकुराच्या जावई-अमोल जगधने यांनी दि.04.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 शिराढोण  : करंजकला, ता. कळंब येथील- भगीरथ सुभाष पवार यांचे दि. 01.02.2023 रोजी 23.00 ते दि.02.02.2023 रोजी 06.00 वा.सु.करंजकला शिवारातील शेतातील अंदाजे 19,600 ₹ किंमतीचे सोयाबीनचे 400 किलो वजनाचे 8 कट्टे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भगीरथ पवार यांनी दि.04.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web