उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

ढोकी  : रुईढोकी, ता. उस्मानाबाद येथील- नेताजी किसन जगताप यांची अंदाजे 25,000 ₹ किंमतीची हिरो स्पेलंडर प्लस मोटारसायकल क्र.एम.एच.25 डब्ल्यु  6990 ही दि.30.01.2023 रोजी 14.00 ते 14.30 वा.दरम्यान कसबे तडवळे येथील आठवडी बाजार येथून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या नेताजी जगताप यांनी दि.31.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर   : काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- सोमनाथ ज्ञानदेव देवगुंडे यांच्या तुळजापूर येथील तुळजाई ट्रेडर्स दुकानाचे पाठीमागील पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.30.01.2023 रोजी 19.00 ते दि 31.01.2023 रोजी 10.00 वा. दरम्यान कापून दुकानातील अंदाजे 62,859 ₹ किंमतीचे साहित्य वॉल मिक्सर, सिंख लॉक, पिलर कॉक, बीब कॉक, ॲगंल कॉक व दोन मोटार असा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सोमनाथ देवगुंडे  यांनी दि.31.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web