धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल  

 
crime

मुरुम  : कलदेव निंबाळा, ता. उमरगा येथील- देविदास भाउराव पावशेरे, वय 53 वर्षे, यांचे कलदेव निंबाळा शिवारातील शेतामधील विद्यूत पंप अंदाजे 10,000 ₹ किंमतीचा हा  दि. 02.07.2023 रोजी 20.00 वा. सु. ते दि.03.07.2023 रोजी 06.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या देविदास पावशेरे यांनी दि.09.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : वडगांव लाख, तुळजापूर येथील- पृथ्वीराज पांडुरंग घाडगे, वय 34 वर्षे, यांचे जेसीबी मधील अंदाजे 1,050 ₹ किंमतीचे 11 लिटर डिझेल दि. 09.07.2023 रोजी 01.30 वा. सु. प्लन्ट किणी येथुन वॉचमन शब्बीर सय्यद, रा. तेर ता. उस्मानाबाद यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या पृथ्वीराज पांडुरंग घाडगे यांनी दि.09.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.    

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद

 वाशी   : रामकुंड, ता. भुम येथील-बप्पा कल्याण चंदनशिवे हे दि. 09.07.2023 रोजी 14.13 वा. सु. आपल्या ताब्यातील टमटम एस  क्र. एम.एच. 25 एम 1794 हे छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना वाशी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत वाशी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : दाबका, ता. उमरगा येथील-नितीन राजेंद्र गायकवाड हे दि. 09.07.2023 रोजी 18.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे एस  क्र. एम.एच. 25 एके 0382 हे उमरगा शहरातील आरोग्य कॉर्नर रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 मद्यपी चालकावर गुन्हा दाखल

 धाराशिव  : महादेव गल्ली, उस्मानाबाद येथील- श्रीधर भागवत ढवळे यांनी दि.08.07.2023 रोजी 19.30 वा.सु. आपल्या ताब्यातील वाहन हे संभाजी चौक रोडवर उस्मानाबाद येथे रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदवला आहे.

                        
गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

धाराशिव  : गावसुद, ता. उस्मानाबाद येथील- विजय लक्ष्मण थिटे हे दि.08.07.2023 रोजी 19.20.00 वा सुमारास सेन्टरल बिल्डींग चौक उस्मानाबाद येथे मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना आनंदनगर पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.                

From around the web