धाराशिव जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  :शिंदेवाडी, ता. उस्मानाबाद येथील- विशाल लक्ष्मण शिंदे, वय 36 वर्ष, यांचे अंदाजे 10,00,000₹ किंमतीचे टाटा कपंनीचे टिपर क्र एमएच 25 एजे 2444 हा दि.30.06.2023 रोजी 05.00 ते 06.00 वा. सु. कुलकर्णी पेट्रोलपंपावरुन उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या विशाल शिंदे यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी :वाशी, येथील- पांडुरंग रामराव कवडे, वय 76 वर्ष, यांचे अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे लुना मोटरसायकल  क्र एमएच 25 एयु 2962 ही दि.28.06.2023 रोजी 19.30 ते दि.29.06.2023 रोजी 07.00 वा. सु. वाशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या पांडुरंग कवडे यांनी दि.30.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


गाव शिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

तुळजापूर  : पाडळी देशमुख, ता. इगतपुरी येथील- शांताराम भैरुनाथ जाधव, भगवान विठोबा वारुंगशे,भाउराव तुकाराम वारगडे या तिघांनी दि.29.05.2023 रोजी 21.15 वा सुमारास पीडब्ल्युडी व्हिआयपी सर्किट हाउस तुळजापूर आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.द.का. कलम 85 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web