उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन आणि मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

शिराढोण  : धनेगाव येथील विश्वमित्र माणिकराव पाटील यांच्या आवाड शिरपुरा येथील गट क्र. 296 मधील शेतातील दोन बैल दि. 25- 26.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी : खेड, ता. उस्मानाबाद येथील सतिश दत्तु शिंदे यांनी त्यांचा महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर क्र. एम.एच. 25 एल 8462 हा आपल्या घरासमोर लावला असता तो दि. 20- 21.10.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सतिश शिंदे यांनी दि. 26 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे दाखल 

ढोकी : किणी, ता. उस्मानाबाद येथील बालाजी घोडके यांनी दि. 21.10.2021 रोजी 14.00 वा. सु. किणी शिवारातील शेतात चरण्यास सोडलेल्या म्हशी शेजारील- चंद्रसेन घोडके यांच्या शेतात गेल्या. या कारणावरून चंद्रसेन यांसह त्यांचा मुलगा- लक्ष्मण यांनी बालाजी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड डोक्यात मारुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाली घोडके यांनी दि. 26.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : आपसिंगा, ता. तुळजापूर येथील रावसाहेब क्षिरसागर यांनी त्यांच्याकडे कामास येत नसल्याच्या कारणावरुन ग्रामस्थ- दत्ता कांबळे यांना दि. 26.10.2021 रोजी 13.30 वा. सु. गावातील जि.प. शाळेसमोर शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्ता कांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web