उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जिल्ह्यातील एक 22 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 14.12.2021 रोजी 13.00 वा. सु. माहेरच्या घरात एकटी असल्याची संधी साधून नात्यातील एका पुरुषाने विचारपुस करण्याच्या बहाण्याने घरात शिरुन त्या महिलेवर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्यासह तीच्या मुलास ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने दि. 20.01.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 452, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एका 23 वर्षीय तरुणाने गावातीलच एका 14 वर्षीय मुलीशी (नाव- गाव गोपनीय) दि. 07- 18.01.2022 रोजी दरम्यान जवळीक साधुन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केला. याचा जाब त्या मुलीची आईने संबंधीत तरुणाच्या पित्यास विचारला असता त्याने, “माझ्या मुलास सोडवून आणण्याची माझ्यात धमक आहे. तुम्हा मायलेकींना मी गावात राहु देणार नाही.” अशा धमकावले. अशा मजकुराच्या मलीच्या आईने दि. 20 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 506 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12, 17 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद: आंबेहोळ येथील शमा व कमाल शेख हे पती- पत्नी दि. 18.01.2022 रोजी  12.00 वा. आपल्या शेतात होते. यावेळी गावकरी- ताजोद्दीन हनीफ शेख यांनी खांबावरील वीज पुरवठ्याच्या वादातून नमूद शेख पती- पत्नीस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व धारदार वस्तूने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शमा शेख यांनी दि. 20 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : लोहारा येथील भुमी अभिलेख कार्यालयाचे पथक दि. 20.01.2022 रोजी 12.00 वा. सु. दस्तापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या सेवा रस्त्याची मोजणी करत होते. यावेळी तेथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते- श्रीरंग सरवदे, रा. काळानिंबाळा (पुर्व), ता. उमरगा यांना दस्तापूर ग्रामस्थ- सखुबाई पांडुरंग पाटील यांसह त्यांचा मुलगा- आप्पाराव व नातू- नचिकेत, नातसुन- शारदा यांनी जातीवाचक शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या श्रीरंग सरवदे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 294, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम- 3 (1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web