उस्मानाबाद जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे 

 
Osmanabad police

उस्मानाबाद : एका तरुणाने नात्यातीलच एका 14 वर्षीय मुलीशी (नाव- गाव गोपनीय) मागील सहा महिन्यापुर्वी लैंगीक संबंध प्रस्थापित केले होते. यातून ती मुलगी गर्भवती झाल्याने ती वेळे अगोदरच बाळातीन झाल्याने अती रक्तस्त्रावामुळे तीला वैद्यकीय उपचारकामी रुग्णालयात अंतररुग्ण म्हणुन दाखल केले आहे. अशा मजकुराच्या संबंधीत मुलीने उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 376 सह पोक्सो कायदा कलम- 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एक 24 वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 18.11.2021 रोजी तीच्या मुलांसह घरात झोपलेली असतांना नात्यातीलच एका पुरुषाने त्या महिलेच्या खोलीत घुसून तीच्यावर लैंगीक अल्याचार केला. यावर त्या महिलेने त्या पुरुषाच्या पत्नीस हि हकीकत सांगीतली असता तीने तीला शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 376, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

मुरुम  : बसवकल्याण, जि. बिदर, राज्य- कर्नाटक येथील एकनाथ जयप्पा कावळे, वय 35 वर्षे व सुनिल किरण गायकवाड हे दोघे दि. 13.10.2021 रोजी 19.30 वा. सु. दाळींब येथील शिवाजीनगर तांडा परिसरातील रस्त्याने मोटारसायकल क्र. के.ए. 56 जे 1922 ने प्रवास करत होते. दरम्यान चालक- एकनाथ कावळे यांनी मो.सा. निष्काळजीपने, भरधाववेगात चालवण्याने रस्त्यावरील खडीवरुन घसरली. या अपघातात एकनाथ कावळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने ते उपचारादरम्यान मयत झाले तर सुनिल गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. अशा मजकुराच्या गायकवाड यांनी दि. 19 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web