तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

तामलवाडी  : एका गावातील एक 12 वर्षीय पिडीत मुलीचे (नाव- गाव गोपनीय) दि.01.06.2023  ते दि.09.05.2023 रोजी 10.00 वा. सु. सदर पिडीत मुलीवर गावातील एका तरुणाने गावातील घरात तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि.22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376,376 (2),(ड),(एन),(एफ)376, (अ),(ब)भादविसह कलम 4,5 (एल),(एन) 6,9 (एल),12 बा.लै.अ.प्र.कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तामलवाडी : एका गावातील एक 23 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि.09.05.2023 रोजी 23.45 ते दि.19.06.2023 रोजी 10.00 वा. सु. सदर महिला गावातील एका तरुणाने गावातील घरात तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. व तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि.22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 366,376 (2) (एन), 323, 504,506, 507, 34 भादवि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

धाराशिव  : आळणी ता.उस्मानाबाद येथील- नागरबाई लाला पवार वय 22 वर्ष रा पारधी पिढी, पापनाशनगर उस्मानाबाद. ह.मु. आळणी ता.जि. उस्मानाबाद यांनी  दि. 22.06.2023 रोजी 18.38 पारधी पिढी, आळणी ता.जि. उस्मानाबाद येथे गळफास घेउन आत्महत्या केली. आळणी ता.जि. उस्मानाबाद येथील 1. लाला मगन पवार 2. मगन पवार 3. साखरबाई मगन पवार यांनी नागरबाई यांना लग्न करायचे त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून नागरबाई यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मच्छिंद्र भुजंग काळे यांनी दि. 22.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web