धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव : आरोपी नामे-1) हनुमंत लक्ष्मण वाघमोडे, 2) अविनाश हनुमंत वाघमोडे, 3) स्वप्नील हनुमंत वाघमोडे, रा. आंबेजवळगा, ता. जि.उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.18.08.2023 रोजी 09.30 वा. सु. कौडगाव येथील येशीजवळ फिर्यादी नामे बाबा मारुती वाघमोडे, वय 38 वर्षे रा. आंबेजवळगा ता. जि. उस्मानाबाद यांना  मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या बाबा वाघमोडे यांनी दि.19.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323, 504,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : आरोपी नामे-1)आनंत माणिक जाधव,2)ओमकार माणिक जाधव,3) अरुण माणिक जाधव, 4) अनिल माणिक जाधव,5) विनायक मानिक जाधव, 6) बालिका आनंत जाधव, 7) मालनबाई माणिक जाधव, 8) सुवार्णा अरुण जाधव सर्व रा. घाटंग्री ता. जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि.14.08.2023 रोजी 10.30 वा. सु. घाटंग्री शिवारात शेत गट नं 50 येथे फिर्यादी नामे- केशव महादेव हराळे, वय 30 वर्षे, रा. घाटंग्री, ता. जि. उस्मानाबाद यांना आनंत जाधव यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्याने,कुह्राडीने डोक्यात मारुन जखमी केले.तसेच केशव यांचे वडील, पत्नी हे त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या केशव हराळे यांनी दि.19.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324,323, 504,506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web