धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : आरोपी नामे-1)विश्वनाथ बब्रुवान काळे, 2) रोहीत विश्वनाथ काळे, 3) दिपक विश्वनाथ काळे, 4) एकनाथ दिलीप काळे, 5) गोपाळ भिमराव काळे, 6) समाधान रामचंद्र काळे  सर्व रा. पवारवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी  दि.08.08.2023 रोजी 08.30 ते 09.50 वा. सु. हनुमान मंदीराचे जवळ पवारवाडी येथे फिर्यादी नामे-उमेश भागवत काळे, वय 34 वर्षे, रा. पवारवाडी, ता. जि. उस्मानाबाद हा. मु. कोल्हापूर यांना संगणमत करुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी मारहान करुन जखमी केले. उमेश काळे यांचे बचावास त्यांचे भाउ आले असता त्यासही  शिवीगाळ करुन मारहाण केली. व त्यांचे खिशातील 4,780 ₹ रोक रक्कम काडून घेतली. वडीलांचे फोनवर फोन करुन तुमच्या मुलांना जिवंत मारुन टाकतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या उमेश काळे यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 327, 143, 147, 149, 323,  507 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 नळदुर्ग  :आरोपी नामे 1) संजय चव्हाण, 2) शंकर पवार दोघे रा. अक्कलकोट जि. सोलापूर अन्य 2 यांनी आर्थिक व्यावहारचे कारणावरुन दि.09.08.2023 रोजी 14.30 वा. सु. इंदीरानगर चिवरी येथे फिर्यादी नामे- संगिता ज्ञानेश्वर जाधव, वय 27 वर्षे रा.इंदीरानगर, चिवरी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे पती नामे ज्ञानेश्वर अभिमन्यु जाधव यांना घरात घुसुन जातिवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहान करुन जिपमध्ये घालून घेवून गेले. अशा मजकुराच्या संगिता जाधव यांनी दि.09.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-365, 452, 323, 504, 506, 34, सह अ.जा.ज. प्र. का. कलम 3(1) (आर),  3(1) (एस), 3 (2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web