धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

येरमाळा  : आरोपी नामे-1)रघुनाथ नवनाथशिंदे,2) निलेश रघ्ज्ञुनाथ शिंदे, 3) गणेश रघुनाथ शिंदे, सर्व रा. खामकरवाडी, ता. वाशी जि. उस्मानाबाद यांनी सामाईक बांधावरील गवत काढून देण्याचे कारणावरुन दि.06.08.2023 रोजी 09.30 वा. सु. बावी शिवारात शेत गट नं 1373 मध्ये बांधावर फिर्यादी नामे-नवनाथ निवृत्ती शिंदे, वय 78 वर्षे, रा.खामकरवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद यांना सामाईक बांधावरील गवत काढून देत नाहीस असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नवनाथ शिंदे यांनी दि.06.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : आरोपी नामे-1)गोविंद पाटील, 2) किसन रंगा कराळे, 3) गोविंद पाटील यांची आई ,4)ज्ञानेश्वर किसन कराळे,5) भाग्यश्री किसन कराळे, 6) राधिका माने अन्य 2 सर्व रा. तुरोरी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी शेतात रस्त्याचे कारणावरुन दि.05.08.2023 रोजी 10.00 वा. सु. तुरोरी शिवारात शेत गट नं 69 मध्ये फिर्यादी नामे-शिवाजी बाबुराव जाधव वय 43 वर्षे, रा.उमरगा जि. उस्मानाबाद  हा.मु. सिताराम नगर लातुर मा.जि. लातुर यांना शेतात रस्त्याने जात असताना शेत रस्त्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून ज्ञानेश्वर किसन कराळे यांनी कुह्राडीचे दांड्याने शिवाजी जाधव यांचे उजवे हाताचे खुब्यावर मारल्याने खुब्याचे हाड फॅक्चर झाले. इतर सर्वांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, कुह्राडीचे दांड्याने मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शिवाजी जाधव यांनी दि.06.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-325, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web