उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

वाशी  : जुन्या भांडणाचे कारणावरुन ईट, ता. भुम येथील- इमरान सत्तार पठाण यांना दि. 10.02.2023 रोजी 18.00 वा. सु. ईट ते जातेगाव रोडवर भिमा यांच्या घरासमोर गावकरी- शंभु सुब्राव चव्हाण व अन्य 2 यांनी ठार मारण्याच्या उद्देशाने संगणमताने इमरान यांना शिवीगाळ करुन इमरान यांच्या छातीवर डावे बाजूस व उजव्या हाताचे करंगळीवर चाकूने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या इमरान पठाण यांनी दि.12.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : पाणी भरण्याच्या कारणावरुन आनंदनगर मुरुम, ता. उमरगा येथील- श्रीकृष्ण ऊर्फ सोन्या दत्तात्रय बनसोडे यांना दि. 12.02.2023 रोजी 07.00 वा. सु. आनंदनगर येथे पाण्याच्या टाकी जवळ गावकरी-सुधाकर बनसोडे, सुयश बनसोडे, पांडुरंग बनसोडे, शिवाजी बनसोडे व अन्य 3 यांनी संगणमताने शिवीगाळ करुन श्रीकृष्ण यांच्या डोक्यात, हातावर लोखंडी रॉडने, तलवारीने, काठीने मारहान करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच श्रीकृष्ण यांचे आई वडील त्यांच्या बचावास आले असता. त्यांनाही लाथाबुक्याने, काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या श्रीकृष्ण बनसोडे यांनी दि.12.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 324, 341, 323, 143, 146, 147, 149, 504,506, सह भा.ह.का. कलम 4,25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 लैंगिक अत्याचार

 लोहारा  : एका गावातील एक 30 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 12.02.2023 रोजी 01.00 ते 02.00 वा.सु. आपल्या घरात असताना शेजारीच्या गावातील दोन तरुणाने त्या महिलेस गावातील तिच्या घरात असताना तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीने दि.12.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-  376, 506, 109, 34 सह अ.जा.ज.कायदा कलम 3 (2)(व्ह‍ि), 3 (2) (व्ह‍िए), 3(1) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web