कळंब तालुक्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल
कळंब : अंबेशेत वस्ती, अंदोरा येथील- अविनाशनवनाथ तांबारे, आश्विनी तांबारे यांनी शेत वाटणीच्या कारणावरून दि.11.06.2023 रोजी 10.00 वा.सु. अंदोरा शिवार येथे गावकरी- सारिका प्रशांत तांबारे व त्यांचे पती प्रशांत तांबारे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, अंगावर व तोंडावर लाल मिर्च पावडर टाकुन मारहान केली. अशा मजकुराच्या सारिका तांबारे यांनी दि. 11.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : वाकडी, ता. कळंब येथील- विजय रणदिवे, संगिता रणदिवे या दोघांनी मुलाला चापट मारल्याचे कारणावरून दि.11.06.2023 रोजी 20.30 वा.सु.वाकडी येथील समाज मंदीरा समोर गावकरी- भगीरथ रावसाहेब रणदिवे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगडाने मारहान केली. तसेच भगीरथ यांचे पत्नी त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या भगीराथ रणदिवे यांनी दि. 11.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.