धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

तुळजापूर  : खंडाळा, ता. तुळजापूर येथील- बळी पवार, अर्जुन पवार, जिवन लोखंडे, भिमा पवार, वसंत पवार या सर्वांनी  जुन्यावादाचे कारणावरुन दि.13.06.2023 रोजी 07.30 वा.सु. खंडाळा शिवार गावकरी- चातक जिवन कोरेकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, चैन, लोखंडी पाईप, लाकडाने मारहान करुन जखमी केले. तसेच चातक यांचे वडील त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन  जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चातक कोरेकर यांनी दि. 18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 327, 323, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : अंदोरा, कळंब येथील- सचिन ऊर्फ बालू विनायक काळे, बिभीषण काळे, बाग्या काळे, नवनाथ काळे, शिवा काळे, बबलु काळे, संदीपान काळे, डिगा काळे, या सर्वांनी  देवदेवाचे कार्यक्रमाला का आला नाही या कारणावरुन दि.07.06.2023 रोजी 16.00 वा.सु. यैडेश्वरी हॉटेल अंदोरा येथे साठे चौक, कळंब येथील- संतोष ऊफ्र सचिन बब्रुवान काळे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, दगड, लाकडी, ठोकळा, काठीने,गुलारीतील दगडाने मारहान करुन  गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संतोष काळे यांनी दि. 18.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 143, 147, 148, 149, 504, 506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 नळदुर्ग  : कुरेशी गल्ली, नळदुर्ग ग्रामस्थ- भिमाशंकर सिद्राम बताले  यांनी  दि.18.06.2023 रोजी 03.10 येथील एनएच 65 रोडचे बाजूस हॉटेल गौरीचे समोर सार्वजनिक ठिकाणी नळदुर्ग रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावरील गॅस शेगडीवर निष्काळजीपने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो.ठा. येथे  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web