धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

 
crime

लोहारा : एंकोडी (लो), ता. लोहारा येथील- रविंद्र जाधव, कृष्णा जाधव, कमलाकर जाधव या सर्वांनी दि.13.06.2023 रोजी 18.40 वा.सु. पेठसांगवी शिवारातील बालाजी सोमवंशी यांचे शेताजवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरुन जिवे मारण्याचे उद्देशाने गावकरी- विश्वनाथ लक्ष्मण सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, लोंखडी पट्टी, दगड, काठीने मारहाण गंभीर जखीम केले. अशा मजकुराच्या यांनी दि.17.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-307, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा  : उमरगा येथील- आकाश धोत्रे, रोहित चुंगे, लक्ष्मण सुर्यवंशी, शुभम आंबुलगे, ओमकार बंडगर मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेण्याचे कारणावरून दि.15.06.2023 रोजी 10.30 वा.सु. मसानजोगी गल्ली मुळजरोड उमरगा येथे गावकरी- योगेश यल्लाप्पा कडगंचे यांना आकाश यांनी  शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, हंटरने हातावर पाटीवर मारहाण केले. तर योगेश यांचे बचावास आलेले त्यांचे भाउ व्यकंट, वहिनी सुनितास व मित्र जमादार यांना लाथाबुक्यांनी, दगडाने, कोयत्याने मारुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या योगेश कडगंचे यांनी दि. 16.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 324, 504,506, 427, 143, 147, 148, 149 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 फसवणूक 

भूम - भुम पोलीस ठाणे : भुम, जि. उस्मानाबाद येथील- निलेश राजकुमार एखंडे, निखील राजकुमार एखंडे, तर ईट, ता. भुम येथील- शुभम बाहुबली अन्नदाते या तिघांनी दि. 17.07.2021 रोजी 11.00 वा. सु. जनहितम अर्बन मल्टी स्टेट कॉ क्रेडीट सोसायटी लि. वाशी ब्रॅच भुम येथे संगणमत करुन शेअर मार्केट मधून जास्त पैसे कमवून देण्याचे खोटे आमिष दाखवून निलेश रमाकांत खामकर, रा. स्वाध्याय कॉलनी, भुम यांची 8,00,000 ₹ ची फसवणुक केली. पैसे मागितले असता शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा निलेश रमाकांत खामकर यांनी दि. 16.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web